उच्च न्यायालयाने काढली याचिका निकाली
थिवी कोमुनिदादने एमआयआयटी संस्थेला दोन लाख चौरस मीटर (२ लाख चौमी) जमीन १२.५० रुपये प्रति चौरस मीटर दराने दिली होती. ही जमीन देताना योग्य सोपस्कार झालेले नाहीत आणि ती स्वस्त दरात दिली आहे, असा आक्षेप घेत कोमुनिदादच्या सात सदस्यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या याचिका फेटाळल्या असून, थिवी कोमुनिदादने संपूर्ण प्रक्रिया योग्यरित्या पार पाडूनच जमिनीची एमआयआयटीला विक्री केली आहे, असा स्पष्ट निष्कर्ष नोंदवला आहे.