वागातोर, आसगावातील क्लब, ब्यूटीक रिसॉर्ट आस्थापने सील

हडफडे अग्निकांडानंतर प्रशासनाची कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
वागातोर, आसगावातील क्लब, ब्यूटीक रिसॉर्ट आस्थापने सील

वझरात-वागातोर येथील रोमिओ लेन क्लबला ठोकण्यात आलेले सील.

म्हापसा : रोमिओ लेनचा वागातोर (Romeo Lane's Vagator) येथील क्लब आणि आसगाव मधील ब्यूटीक रिसॉर्ट (Boutique resort in Asgaon) मामलेदार कार्यालयाकडून सील करण्यात आला आहे. सुरक्षात्मक उपाय व्यवस्थेची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत सरकारच्या आदेशानुसार रोमिओ लेनच्या या दोन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
साकवाडी-हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये घडलेल्या अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेकडून ही कारवाई केली गेली. त्यानुसार या आस्थापनाच्या मालकीच्या वझरात-वागातोर येथील रोमिओ लेन क्लब तसेच आसगाव येथील रोमिओ लेन ब्यूटीक रिसॉर्टची पडताळणी सरकारी यंत्रणांनी केली. तेव्हा या ठिकाणी देखील सुरक्षात्मक उपाय नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सायंकाळी उशिरा वागातोरमधील रोमिओ लेन क्लबला तर रात्री उशिरा आसगावमधील रोमिओ लेन ब्यूटीक रिसॉर्ट सील करण्यात आले. बार्देशचे मामलेदार अनंत मळीक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
कारवाईचे कारण
* हडफडेतील दुर्घटनाग्रस्त नाईट क्लबमध्ये पर्यटक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा नसल्याचे उघड झाले होते.
* या पार्श्वभूमीवर, रोमिओ लेनच्या मालकीच्या वझरात-वागातोर येथील क्लब आणि आसगाव येथील रिसॉर्टची सरकारी यंत्रणांनी पडताळणी केली.
‍* या दोन्ही ठिकाणीही आवश्यक सुरक्षात्मक उपायांचा अभाव आढळल्याने, सरकारच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली.

हेही वाचा