बेतूल येथे पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता

कुंकळ्ळी अग्निशामक दलाकडून शोधमोहीम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
बेतूल येथे पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता

मडगाव : बेतूल येथील ओएनजीसी येथे कामाला असलेला सुरजीत सिंग (२२, रा. मूळ उत्तरप्रदेश) हा आपल्या सहकार्‍यांसह नदीवर गेला होता. दुपारच्या सुमारास तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडाला. यानंतर कुंकळ्ळी अग्निशामक दलाने शोधमोहीम राबवली परंतु तो सापडून आला नाही.

मूळ उत्तरप्रदेश येथील सुरजीत सिंग हा बेतूल येथील ओएनजीसी प्रकल्पाच्या ठिकाणी कामाला होता. रविवारी सुटीचा दिवस असल्याने सुरजीत याच्यासह त्याचे चार सहकारी फिरण्यासाठी व मौजमजेसाठी साळ नदी पात्रावर गेले होते. दुपारी जेवण झाल्यानंतर चार जणांपैकी सुरजीत सिंग हा पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. इतर मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. पोलिसांना याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर अग्निशामक दलाला याची माहिती देत पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने सायंकाळपर्यंत सुरजीत याचा पाण्यात शोध घेतला. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना शोधूनही सुरजीत सापडून आला नाही. कुंकळ्ळी पोलिसही घटनास्थळी उपस्थित होते. 

हेही वाचा