शेवटी पोलिसांनी केली सुटका
हैदराबाद : कुठेही अनोळखी ठिकाणी जायचे असल्यास आपण आता गुगल मॅपची (Googal Map) मदत घेतो व ते ठिकाण शोधून काढतो. मात्र, गुगलच चुकीची माहिती देऊ लागल्यास काय फसगत होते याचा अनुभव पाच अभियंत्यांनी नुकताच घेतला. पाच अभियंते (Engineer) मिळून ट्रेकला (Tracker) जायला निघाले. त्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली. गुगल मॅपने दिशाभूल केल्याने, वाट चुकून घनदाट जंगलात पोहोचले व तेथेच अडकले.
एका अभियंत्याने ही माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर आईने गृहमंत्र्यांना यासंदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाच ही अभियंत्यांना सुरक्षित ठिकाणी आणले. या संकटात सापडलेल्या अभियंत्यांची नावे हितेश सुरेश पेनमुसु, हिमतेज वारा प्रसाद वाल स्वामी, लिहित चेतन्य मेका, सुशील रमेश भंडारू, विकियत नागेश्वर राव चिलियाला अशी आहेत. आंध्रप्रदेश व तेलंगणातील हैदराबाद येथील हे अभियंते रहिवासी आहेत. नर्मदा जिल्ह्यातील जाखानी जवळील जंगलात, स्टॅच्यू ऑफ युनिटी क्षेत्रात ट्रेकिंगचा थरार अनुभवण्यासाठी आले होते. गुगल मॅप्स वर शोध घेतल्यावर त्यांना तुंगाई टेकडीचा परिसर सापडला. नंतर ट्रेकिंगचा प्रवास सुरू झाला. मोटरसायकली सकाळी पाच ही जणांनी जरवानी गावातील भांगडा फलियाजवळ ठेवल्या. गुगलच्या आधारे चढाईला निघाले. दुपारी अडीचच्या सुमारास आपण वाट हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. गुगल मॅपने दिशाभूल केल्याने वाट चुकून अडचणीत सापडल्याचे लक्षात येताच वाट शोधण्याचा प्रयत्न केला. वाट मिळणे कठीण झाल्याचे लक्षात येताच एका अभियंत्याने आपल्या आईला संपर्क केला. आईने गृहमंत्र्यांशी संपर्क साधला व नंतर पोलिसांनी जाऊन त्यांची सुटका केली.