
जम्मू : जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) बर्फवृष्टीनंतर थंडीची लाट पसरली आहे. येथील अनेक भागांत मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी होत आहे. तापमानात मोठी घसरण झाली आहे. भारतातील (India) अनेक राज्यांमध्ये तापमानात घट झाली असून, थंडीच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.

सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम व आसपासच्या परिसरात बर्फ गोठला आहे. काश्मीर मध्ये धुक्याचा प्रभावही दिसत आहे.

बाजूच्या उत्तराखंड (Uttarakhand) व हिमालचल प्रदेश (Himachal Pradesh) राज्यात हलका पाऊस व हिमवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक राज्यांतील तापमानात घट झाली आहे.

त्यात दिल्ली एनसीआर व उत्तर भारतातील राज्यांचा समावेश आहे. पंजाब (Punjab), राजस्थान (Rajsthan), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), हरयाणा (Haryana), बिहार (Bihar) इत्यादी राज्यांत थंडीची लाट आली आहे.
