१० हजार कोटींची दावा न केलेली रक्कम आरबीआयने केली परत : डिजिटल पोर्टलवर मिळवा माहिती


21 mins ago
१० हजार कोटींची दावा न केलेली रक्कम आरबीआयने केली परत :  डिजिटल पोर्टलवर मिळवा माहिती

नवी दिल्ली : देशातील (Country) बॅंकांनी (Banks) १० हजार कोटी रुपयांची दावा न केलेली रक्कम परत केली आहे. प्रक्रियेनंतर आरबीआयने (RBI) ही रक्कम परत केली आहे. देशातील सर्व बॅंकांमध्ये ६७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पडून आहे. एवढा मोठ्या रकमेवर कुणीही दावा केलेला नाही. बंद पडलेली बॅंक खाती, जुनी खाती, विसरलेल्या एफडी, मॅच्युअर झालेले डिपॉझिट (Deposit), जुने शेअर्स इत्यादीचा या रकमेत समावेश आहे. 

लोकांच्या सोयीसाठी आरबीआयने ‘उद्गम’ नावाचे डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. त्यावर ‘अनक्लेमड’ रकमेविषयी माहिती ‌मिळते. नाव, मोबाईल क्रमांक व जन्मतारीख टाकून ही माहिती मिळू शकते. 

पडून असलेली रक्कम त्यांचे मूळ मालक किंवा त्यांचे वारस यांच्याकडे पोचवण्याचे अभियान आरबीआय सध्या करीत आहे. दावा न केलेल्या रकमेतील १० हजार कोटी रुपये आरबीआयने संबंधितांना परत केली आहे. 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, मागील ३ वर्षांत बॅंकांनी दावा न केलेल्या रकमेपैकी १०,२९७ कोटी रुपये परत केले आहेत. ही रक्कम गेली कित्येक वर्षे दावा न केल्याने, तशीच पडून होती. 

एप्र‌िल, २०२२ ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत ३३ लाखांपेक्षा अधिक डॉर्मेट अकाऊंट्स पुन्हा सक्र‌िय करण्यात आले. नंतर त्यातील रक्कम मूळ मालकांना परत करण्यात आली. 

यासंदर्भात ऑक्टोबर, २०२५ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खास राष्ट्रीय अभियान सुरू केले होते. ‘आपली पुंजी, आपले अधिकार’याअंतर्गत तीन महिन्यांची देशव्यापी मोहिम सुरू करून दावा न केलेली रक्कम मूळ मालकांकडे परत केले जणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले होते. विमा पॉलिसी, बॅंक जमा, भविष्य निधी, शेअर यामधील दावा न केलेल्या रकमेचे मूळ हक्कदार शोधून काढून त्यांच्यापर्यंत रक्कम पोचवण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. 

दावा न केलेली रक्कम 

बॅंक खातेदारांनी बराच काळ दावा न केल्याने बॅंक जमा आरबीआयकडे, शेअर, विमा पॉलिसी सीबीआयकडून (सेबी) आयईपीएफमध्ये हस्तांतर‌ित होतात.

डिजिटल पोर्टलवर मिळवा माहिती 

 लोकांच्या सोयीसाठी आरबीआयने ‘उद्गम’ नावाचे डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. त्यावर ‘अनक्लेमड’ रकमेविषयी माहिती ‌मिळते. नाव, मोबाईल क्रमांक व जन्मतारीख टाकून ही माहिती मिळू शकते. 


हेही वाचा