भारतात या आणि तुमचे म्हणणे मांडा; मुंबई उच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला सुनावले


2 hours ago
भारतात या आणि तुमचे म्हणणे मांडा; मुंबई उच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला सुनावले

मुंबई : भारतात (India)  कोट्यावधी रुपयांचा अपहार करून विदेशात पळालेले उद्योगपती (Industrialist) विजय मल्ल्या (Vijay Mallya) याला, ‘देशात या आणि तुमचे म्हणणे मांडा’, असे मुंबई उच्च न्यायालयाने (High Court of Bombay) सुनावले आहे. मल्ल्याने फरार आर्थ‌िक गुन्हेगार कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान दिले आहे. त्या अर्जावर लगेच सुनावणी घेण्यास नकार देत न्यायालयाने त्यांना भारतात येण्यास सुनावले.

मल्ल्या याने एफईओ कायद्याचे कलम १२ (८) घटनाबाह्य असल्याचा दावा करीत त्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. आरोपांतून निर्दोष ठरल्यास जप्त केलेली मालमत्ता परत करण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे नमूद केले आहे व ही मनमानी असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

विजय मल्ल्या याने दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर व न्यायाधीश गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीत खंडपीठाने याचिकेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मल्ल्याच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी बाजू मांडली. युक्त‌िवाद करताना  वकील देसाई यांनी मल्ल्या लंडनमध्ये वास्तव्य करून असल्याचे सांगितले.

त्यावर न्यायाधीशांनी मल्ल्याला प्रथम भारतात या व मग तुमचे म्हणणे मांडा, असे सुनावले. भारतात येऊन म्हणणे मांडल्यावर ऐकू असे स्पष्ट केले. न्यायालयात अर्ज करणारे मल्ल्या भारतात कधी येणार हे वकिलांनी सांगावे, नंतरच अर्जावर सुनावणी घेऊ,  असे खंडपीठाने स्पष्ट केले. आता सुनावणी २३ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्या

हेही वाचा