
पणजी: गोव्यातील गाजलेल्या सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित आणि सराईत गुन्हेगार जेनिटो कार्दोजो याला मेरशी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

१८ सप्टेंबर रोजी काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कार्दोजो न्यायालयीन कोठडीत होता. त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. आज सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना काही कठोर अटी घातल्या आहेत. यामध्ये कार्दोजोला १० लाख रुपयांची हमी (Surety) जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, त्याला इतर सर्व आवश्यक अटींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

रामा काणकोणकर यांच्यावर कासारझाल, करंझाळे येथे दुपारच्या वेळी हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि त्यांच्या तोंडाला शेण फासण्यात आले होते. हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि यात कार्दोजोचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते.

(बातमी अपडेट होत आहे)