आगियार यांना डीजीसीडी रौप्य प्रशंसापत्र जाहीर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
आगियार यांना डीजीसीडी रौप्य प्रशंसापत्र जाहीर

पणजी :  भारत सरकारच्या (Indian Government) गृह मंत्रालयाच्या (Home Ministery) नागरी संरक्षण महासंचालकांनी २०२५ च्या ६३ व्या होमगार्ड्स (Home Guards) आणि नागरी संरक्षण स्थापना दिनानिमित्त पणजी (Panjim) शहराचे नागरी संरक्षण वॉर्डन जॉन आगियार यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल डीजीसीडीचे प्रशंसापत्र आणि डिस्क जाहीर केले.

नागरी संरक्षण महासंचालक (डीजीसीडी) चा रौप्य प्रशंसापत्र हा भारतातील अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक संघटनांच्या कर्मचाऱ्यांना अपवादात्मक क्षमता आणि गुणवत्तेने चिन्हांकित केलेल्या सेवेसाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. जॉन आगियार यांनी कोविड काळात आकर्षक कोविड जागरूकता गाणी लिहिली,  लस चाचण्यांसाठी स्वयंसेवा केली. त्यांचे कार्य पाहून मुख्यमंत्र्यांनीही त्यांना कोविड योद्धा म्हणून मान्यता दिली होती. 

 आगियार यांनी नागरी संरक्षण कार्यालयाद्वारे आयोजित अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये आणि आयएनसीओआयएस (INCOIS), डिडिएमए (DDMA), एसडीएमए (SDMA) व एनडीएमए (NDMA)  द्वारे आयोजित मॉक सरावात भाग घेतला. त्यांनी गोवा पोलिस विभागाचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काम केले आहे.

होमगार्ड्सचे मानद कंपनी कमांडर म्हणून काम करताना,  आगियार यांना २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते "गुणवत्तेच्या सेवेसाठी"  राष्ट्रपतींचे गृहरक्षक पदक व  गोव्याच्या (Goa) मुख्यमंत्र्यांचे सुवर्णपदक आणि नागरी संरक्षण पदक देखील मिळाले.  इतर पुरस्कारही मिळाले.  नंतर त्यांना स्वातंत्र्यदिनी २०२१ रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक मिळाले. 

१३ जून, २०११ ते ८ डिसेंबर, २०१७ पर्यंत गोवा पोलिस विभागासाठी जनसंपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. 

 अनेक वेळा राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन समारंभात होमगार्ड्स तुकडीचे नेतृत्व केले. ६ डिसेंबर, २०११ रोजी होमगार्ड स्थापना दिन समारंभात आगियार यांनी परेड कमांडरची औपचारिक भूमिका बजावली. 

आगियार हे माहिती आणि प्रसिद्धी विभागात माहिती अधिकारी होते. माजी परराष्ट्र, रसायने आणि खते व वित्त मंत्रालयात केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांचे यांचे एपीएस म्हणूनही काम केले. 

हेही वाचा