डिचोली पोलीस स्थानक भारतातील ५ व्या क्रमांकाचे सर्वोत्तम : गृह मंत्रालयाने दिली मान्यता

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
11 mins ago
डिचोली पोलीस स्थानक भारतातील ५ व्या क्रमांकाचे सर्वोत्तम : गृह मंत्रालयाने दिली मान्यता

पणजी : केंद्रीय गृह मंत्रालयाने (Home Department) २०२५ साठी गोव्यातील (Goa) डिचोली पोलीस स्थानकाला (Bicholim Police Station) भारतातील (India) पाचव्या क्रमांकाचे सर्वोत्तम पोलीस स्टेशन म्हणून मान्यता दिली आहे. 

डिचोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे, उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. व तत्कालीन पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली डिचोली पोलीस स्थानकाने गुन्हेगारी नियंत्रण व शोधात उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याशिवाय गेल्या सहा महिन्यांत पोलीस स्थानकात पायाभूत सुविधांमध्येही वाढ केली होती.

मुलांसाठी अनुकूल खोली. जिम, कर्मचाऱ्यांसाठी दर्जेदार कॅन्टीन, स्वच्छता बॅरेक्स इत्यादींचा त्यात समावेश आहे. सप्टेंबरमध्ये गृह मंत्रालयाच्या स्वतंत्र पथकाने केलेल्या सर्वेक्षणात या सर्व निकषांचा विचार करण्यात आला होता. डिचोली पोलीस स्थानकाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली मान्यता ही गोवा पोलीस व गृह विभागासाठी अभिमानाची बाब असल्याचे संबोधले जात आहे. सर्वत्र कौतुक होत आहे. 

हेही वाचा