‘कुडाळला जायचे होते बस पाहून सोलापूरला जावेसे वाटले’

पणजी : कदंबा वाहतूक महामंडळाच्या (Kadamba Transport Corporation) बस सेवेवर नाके मुरडणारे, नावे ठेवणारे अनेक आहेत. मात्र, कदंबा बसगाड्यांमुळे गोव्यातील (Goa) कानाकोपऱ्यात जाणारे, विद्यार्थी यांची बऱ्यापैकी सोय होते. कदंबाच्या आंतरराज्य बससेवेमुळेही अनेकांची सोय होते. कदंबा बसचा असाच एक सुखद अनुभव अर्चना गावकर यांनी व्यक्त केला आहे. तिला जायचे होते; कुडाळला (Kudal) तर कदंबा बस जात होती सोलापूरला. मात्र, बस पाहून तिला सोलापूरला जावे असे वाटले.
पणजी कोल्हापूर, पंढरपूर सोलापूर या बसगाडीचा अर्चना गावकर यांनी कथन केलेला अनुभव तिच्याच शब्दात खालीलप्रमाणे आहे.
‘कुडाळला जायला निघाले होते’.. आणि मिळाली थेट ‘सोलापूर’ बस. आज एक भारी अनुभव झाला! मला कुडाळला जायचे होते. पण बस पाहून मन म्हणाले. तू आज सोलापूर थोडं भटकून ये. खूप दिवस झाले गेलीस नाही तिकडे. बस स्टॉपवर गेल्यावर जी बस मिळाली ती थेट सोलापूरची. आता माझ्या मेंदूत प्रश्नचिन्ह? ही बस मिळाली म्हणजे.. मी आता सोलापूरलाच जावं का काय? त्यात कंडक्टर पण गोवन भाषेत बोलला की, सोलापुराक वयत काय तू? चल मगो. मी मनात म्हणत होतय जावक होया असा वाटता. पण काम सोडून नाय जावं शकतं ना! म्हणजे परिस्थिती अशी झाली, बस म्हणते चल सोलापूर. मी म्हणते मनापासून हो... पण प्रत्यक्षात नाही. शेवटी बस सोलापूरला निघाली. आणि मी माझ्या कामावर.
फरक एवढाच बस पोहोचली ‘लास्ट स्टॉप’ला. आणि मी पोहोचले.. हकीकत समजुतीच्या स्टॉप वर. बस छात होती. प्रवास मस्त स्मूथ रिलॅक्स झाला. मी जेव्हा हात दाखवून बस थांबवली तेव्हा रात्री होती. मला वाटलं की प्रायव्हेट बस आहे पण नंतर समजल की गोव्याची सरकारी बस आहे. या शब्दात अर्चना गावकर यांनी आपला कदंबा बसगाडीचा अनुभव व बसगाडीचा फोटोही आपल्या फेसबुक खात्यावर शेअर केला आहे.