जिल्हा पंचायत निवडणूक : आरजीचे आणखी १४ उमेदवार जाहीर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
जिल्हा पंचायत निवडणूक : आरजीचे आणखी १४ उमेदवार जाहीर

पणजी : गोव्यात (Goa) जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी (Zilla Panchayat Election) आरजीने (RG Party) आपले आणखी १४ उमेदवार जाहीर केले आहेत.  जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी युती करण्याचे आश्वासन देऊन नंतर आपले उमेदवार जाहीर करून कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड पक्षाने आपली फसवणूक केल्याचा दावा आरजी पक्षातर्फे करण्यात आला होता. 

आरजी पक्ष प्रमुख मनोज परब यांनी वरील दावा केला होता. त्यानंतर उमेदवार निश्च‌ित करण्यासाठी पक्षाची बैठक बोलावली होती. त्यानंतर आता १४ उमेदवार जाहीर केले आहेत. 

त्यात खालील उमेदवारांचा समावेश आहे. 

उत्तर गोवा जिल्हा 

धारगळ : अनिल हरमलकर (सर्व‌सामान्य), कळंगुट : अनया कांदोळकर (दीपा) (महिला), सुकूर : तिवोतिनो जॉन फेलीक्स लोबो (सर्व‌सामान्य), रेस मागोस : आर्लेनी ब्रागांझा (महिला), पेन्ह दी फ्रान्स : रोहन धवडे (सर्व‌सामान्य), ‌चिंबल : दिपिका काणकोणकर (महिला), नगरगाव : निलेश गावकर (सर्व‌सामान्य).

दक्षिण गोवा जिल्हा

उसगाव गांजे : निरुपा गावडे (महिला), राय : आंतोनेता फर्नांडीस (एसटी महिला), कोलवा : अॅंतोनी रॉबर्टस (सर्वसामान्य), वेळ्ळी : डॅगली फर्नांडिस (सर्वसामान्य), सावर्डे : सपनेश गावकर   (एसटी), धारबांदोडा : गितेश गावकर (सर्वसामान्य), कुठ्ठाळी :  आंजेलीनी तेलीस (महिला). 

हेही वाचा