दुचाकीस्वार महिला-मुलगी जखमी; वाहतूक कोंडीमुळे पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पणजी: जुन्या मांडवी पुलावर (Mandovi Bridge) आज शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात चार चारचाकी वाहने आणि एका दुचाकीचा समावेश होता. एका मालवाहू गाडीने (Goods Carrier) एका कारला जोरदार धडक दिल्यानंतर हा अपघात झाला आणि या अपघातामुळे इतर वाहनांची चेन रिएक्शन झाली. या अपघातात दुचाकीवर असलेल्या एक महिला व एक मुलगी किरकोळ जखमी झाल्या असून, सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
पहा व्हिडिओ
अपघात झाल्यानंतर टॉ ट्रक (Tow Truck)चा चालक घटनास्थळावरून लगेच पळून गेला, अशी माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सदर चालक मद्यधुंद अवस्थेत होता.

अपघातामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आणि नुकसानग्रस्त वाहने बाजूला काढण्यासाठी वाहतूक पोलीस (Traffic Police) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पळून गेलेल्या चालकाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

बातमी अपडेट होत आहे.