इंडिगो समस्या : रेल्वेने ३७ गाड्यांमध्ये ११६ डबे वाढवले

दाबोळी विमानतळावरील १४ विमाने रद्द

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
45 mins ago
इंडिगो समस्या : रेल्वेने ३७ गाड्यांमध्ये ११६ डबे वाढवले

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीच्या (Indigo Company) विमानसेवेत (Flights) अडथळा निर्माण झाल्याने व अनेक विमान उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांना बराच फटका बसला. प्रवाशांच्या मदतीला आता भारतीय रेल्वे (Indian Railway) धावली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या सोडण्याबरोबरच रेल्वेने ३७ गाड्यांमध्ये ११६ डबे वाढवण्याचे जाहीर केले आहे. गोव्यातील (Goa) दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) आज (शनिवारी) इंडिगोची १४ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. 

पश्च‌‌िम रेल्वेने साबरमती व दिल्ली जंक्शन यामध्ये सुपरफास्ट खास रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. साबरमती दिल्ली जंक्शन सुपरफास्ट आपल्या चार फेरी पूर्ण करणार असल्याचे पश्चिम रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

इंडिगोची उड्डाणे रद्द करण्यात आल्यानंतर प्रवाशांची गैर सोय झाली व प्रवासी अडकले. त्यांची सोय करण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली व ३७ गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

दाबोळीत १४ उड्डाणे रद्द 

दरम्यान, गोव्यातील दाबोळी विमानतळावर आज शनिवारी इंडिगोची १४ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. 

हेही वाचा