इंडिगो सेवा ठप्प : सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
इंडिगो सेवा ठप्प : सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली :  इंडिगो विमान (Indigo Flights) सेवेचा उडालेला बोजवारा व प्रवाशांना बसत असलेला फटका; यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल करणारे न्यायाधीशांच्या निवासस्थानी पोहोचले व तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. 

सरन्यायाधीश सूर्यकांत (Chief Justice Surya Kant) यांनी याचिकाकर्त्यांच्या वकीलाला आपल्या घरी बोलावले. ‌विमान उड्डाणे रद्द प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत प्रवाशांची झालेली गैरसोय व कराव्या लागलेल्या संकटांचा सामना यासंदर्भात दाद मागण्यात आली आहे. 

इंडिगोच्या विमान समस्येची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. याच‌िकाकर्त्यांच्या वकिलाला सरन्यायाधीश सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी घरी बोलावले आहे. विशेष खंडपीठ स्थापन करून सुनावणी घेण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी विमान देखरेख संस्था, डीजीसीएने काही सवलती देऊन कामकाज सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले.

मात्र, सलग चौथ्या दिवशी विमान कंपनीचे कामकाज कोलमडले. शुक्रवारी इंडिगोने १ हजाराहून अधिक विमान उड्डाणे रद्द केली. त्यामुळे प्रवाशांचे बरेच हाल होत आहेत व इतर कंपन्यांनी ही संधी साधून विमान त‌िकीट भरमसाठ वाढवली आहे. आता या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. 

 

 

 


हेही वाचा