मडगाव-कारवार महार्गावर बार्शे-पाडी दरम्यान एलपीजी टॅंकरचा अपघात

दोन्ही बाजूची वाहतूक वळवली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
42 mins ago
मडगाव-कारवार महार्गावर बार्शे-पाडी दरम्यान एलपीजी टॅंकरचा अपघात

पणजी : मडगाव-कारवार (Margao-Karwar) महामार्ग एनएच-६६ वर बार्शे-पाडी दरम्यान एलपीजी टॅंकरचा अपघात झाला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातानंतर (Accident) सुरक्षेच्या कारणास्तव मडगाव ते काणकोण हमरस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक काणकोण-आगोंद-बेतुल (Canacona-Agond-Betul) मार्गे वळविण्यात आली आहे. 

अपघाताची माहिती मिळताच राज्य सरकारची आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मामलेदार, उपजिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी, यंत्रणा घटनास्थळी पोहोचले आहेत.

या ठिकाणी पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. कुंडईहून एलपीजी कंपनीची यंत्रणाही अपघातस्थळी दाखल झाली आहे. अपघातानंतर मडगाव-काणकोण महामार्गावरील अवजड वाहने तात्पुरती थांबवण्यात आली आहेत. अन्य वाहतूक काणकोण-आगोंद-बेतुल मार्गे वळविण्यात आली आहे. 

दरम्यान, वाहन चालकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन न करता वाहने हाकावीत व वाहतूक कोंडी होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.