‌‌चिंचणी येथे घराला आग : ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
33 mins ago
‌‌चिंचणी येथे घराला आग : ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

पणजी : सासष्टी तालुक्यातील (Salcete Taluka) चिंचणी (Chinchinim)  येथे सोमवारी (Monday) सायंकाळी घराला भीषण आग (Fire) लागली. त्यात ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घराला अचानक आग लागल्याने एकच खळबळ माजली. घटनेची माहिती अग्न‌िशमन दलाला देताच, त्यांनी येऊन आग विझवली. कुंकळ्ळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवला. आगीने पेट घेतल्याने घराचे छप्पर जळून खाक झाले असून, त्यात बरीच हानी झाली आहे. आग नेमकी कशी लागली याची माहिती अग्न‌िशमन दल घेत आहे. अधिक तपास कुंकळ्ळी पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा