अंगावर होळी पडलेल्या पोलीस हवालदाराचा मृत्यू : गोमेकॉत निधन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
45 mins ago
अंगावर होळी पडलेल्या पोलीस हवालदाराचा मृत्यू : गोमेकॉत निधन

पणजी : डिचोली तालुक्यातील (Bicholim Taluka) एका गावात अंगावर होळी पडून जखमी झालेले पोलीस हवालदार (Police Head Constable)  प्रणव मिशाळ (४२ वर्षे, मेणकुरे, डिचोली) यांचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय (Goa Medical college)  रुग्णालयात निधन झाले.

काल होळीची तयार करीत असताना झाड अंगावर पडून गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू होते. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात सुरक्षा विभागात ते होते व सरकारी अभियोक्त्यांच्या हाताखाली सेवा बजावत होते. 

त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, आई वडील व भाऊ असा परिवार आहे. एक चांगले नाट्यकलाकार होते व मनमिळावू स्वभावाचे म्हणून पर‌िचीत होते. त्यांच्या अकाली निधनाबद्दल पोलीस खात्यातील सहकारी व मित्रपरिवाराने दु:ख व्यक्त केले आहे. 

हेही वाचा