
पणजी: गेल्या वर्षीच्यातुलनेत राज्याच्या फेब्रुवारीमहिन्याच्या जीएसटी (GST)संकलनात ७ टक्क्यांनीवाढ झाली आहे. यंदाफेब्रुवारी महिन्यात जीएसटीद्वारेएकूण ४३० कोटी रुपये महसूल(Revenue) गोळा करण्यातआला आहे.
गतवर्षीच्याफेब्रुवारी महिन्यात जीएसटीसंकलन ४०३ कोटी रुपये होते.केंद्रीय अर्थ खात्यानेनुकतीच ही माहिती जारी केलीआहे.आर्थिक वर्ष२०२५-२६ मध्ये(फेब्रुवारी अखेरीस) केंद्र सरकारनेइंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी)(IGST) मधून गोव्याला(Goa) दुसऱ्या टप्प्यातील४ हजार १७८ कोटी रुपयांचा वाटादिला आहे.
मागीलवर्षी हा वाटा ४ हजार १३६ कोटीरुपये होता. तरपहिल्या टप्प्यात गोव्याला२०२४-२५ मध्ये २हजार ३८१ कोटी तर २०२५-२६मध्ये २ हजार ४३४ कोटी रुपयांचावाटा देण्यात आला होता.
एप्रिल२०२५ ते फेब्रुवारी २०२६ मध्येजीएसटी द्वारे केंद्रानेगोव्यातून २ हजार ५४३ कोटीतर राज्याने ३ हजार ८२५ कोटीरुपये संकलन केले आहे. वरीलकालावधीत जीएसटीसह अन्यस्वरूपातून एकूण ६ हजार ३६९कोटी रुपये जमा झाले आहेत.
गत वर्षीच्या एप्रिलते फेब्रुवारीच्या तुलनेतयंदा राज्यातील जीएसटी
संकलानातील घट०.९ टक्के असल्याचेकेंद्रीय अहवालात नमूद केलेआहे.
संपूर्ण देशाचाविचार करता फेब्रुवारी महिन्यातजीएसटी संकलन १ लाख ६१ हजारकोटी रुपयांच्या वर गेले आहे.
देशाचे जीएसटी संकलनमागील वर्षीच्या फेब्रुवारीमहिन्यापेक्षा ७.९टक्क्यांनी जास्त आहे.फेब्रुवारी महिन्यातमहाराष्ट्रातून सर्वाधिक१६ हजार ५८१ कोटी जीएसटी संकलनझाले. तर मिझोराममधून सर्वात कमी ८० कोटी रुपयेजीएसटी संकलन झाले.