कर्नाटक : बंगळुरूहून गोव्यात येणारे वाहन रामनगर येथे पलटी, चालक गंभीर जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th October, 11:55 am
कर्नाटक : बंगळुरूहून गोव्यात येणारे वाहन रामनगर येथे पलटी, चालक गंभीर जखमी

जोयडा : रामनगर-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जळकट्टीजवळ आज शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. बंगळूरु येथून गोव्यात पर्यटनासाठी कुटुंबाला घेऊन येणारे एक वाहन पलटी झाले, यात वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला.

अपघाताच्या वेळी या वाहनात चालक वगळता इतर सहा प्रवासी असे एकूण सात प्रवासी होते. सुदैवाने इतर प्रवाशांना मोठी दुखापत झाली नाही. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव प्रज्वल (वय २५, बंगळूर) असे आहे. अपघातानंतर त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून रामनगर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपास सुरू आहे.

( बातमी अपडेट होत आहे. ) 

हेही वाचा