नवी दिल्ली : या वर्षी कडाक्याची थंडी! : ११० वर्षांत तिसऱ्यांदा कुडकुडणारी थंडी

८६ टक्के हिमालयाचा भाग बर्फाने भरलाय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
नवी दिल्ली : या वर्षी कडाक्याची थंडी!  : ११० वर्षांत तिसऱ्यांदा कुडकुडणारी थंडी

नवी दिल्ली : पावसाने यावर्षी कहर केला. त्याचप्रमाणे यावर्षी थंडीचा (Cold) कहर सहन करावा लागणार आहे. हिमालयाचा (Himalay) 

 ८६ टक्के भाग बर्फाने भरलेला आहे. यावर्षी दोन महिन्यांपूर्वीच ही स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम जाणवणार असून, ११० वर्षांत तिसऱ्यांदा अशी कडक थंडी पडणार आहे. हिमालयातील तापमान ३ अंश सेल्सिअसने खाली उतरले आहे. 

ला निनाचा परिणाम ही प्रशांत महासागरात दिसून येणार आहे. महासागरातील तापमान ही बरेच कमी राहणार आहे. डिसेंबर महिन्यात ला निनाचा इफेक्ट दिसून येणार व थंडी ही वाढणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही वर्षांत कडाक्याची थंडी पडणे बंद झाली होती. पावसाळा व उन्हाळाच राहिला आहे की काय असे म्हणण्यासारखी स्थिती होती. मात्र, यावर्षी थंडी पडणार असल्याने तिला सामोरे जाण्याची तयारी करावी, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा