स्टाफ नर्सने केला युवकाचा विनयभंग; तुरुंगवास,चाबकाच्या फटक्यांची शिक्षा

भारतीय नर्स अडचणीत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
स्टाफ नर्सने केला युवकाचा विनयभंग; तुरुंगवास,चाबकाच्या फटक्यांची शिक्षा

सिंगापूर : इस्पितळात नोकरी करणाऱ्या स्टाफ नर्सने (Nurse) एका युवकाचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोप सिद्ध होऊन स्टाफ नर्सला‌ शिक्षा झाली आहे. तुरुंगवास व चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ही नर्स भारतीय आहे.

सिंगापूरच्या (Singapore) रॅफल्स इस्पितळात ही घटना घडली आहे. भारतीय नागरिक (Indian Citizen) असलेली युवती या इस्पितळात नर्स म्हणून नोकरी करीत होती. युवकाचा विनयभंग केल्याचे आरोप सिद्ध झाल्यानंतर नर्सला १४ महिन्यांचा तुरुंगवास व सिंगापूरात दिली जाणारी दोन चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा सुनावलेल्या नर्सचे नाव एलिपे शिवा नागु (३४ वर्षे) असे आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, जून, २०२५ मध्ये विनयभंगाची घटना घडली होती. एक युवक आपल्या आजारी आजोबांसोबत रॅफल्स रुग्णालयात होता. संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास युवक प्रसाधनगृहात गेला होता. त्यानंतर हात धुण्यासाठी बाहेर आला. त्यावेळी एलिपेने आत डोकावून पाहिले. युवकाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपी नर्सने त्या युवकाला निर्जंतुक करण्याच्या बहाण्याने त्याच्या हाताला साबण ही चोळला. 

तक्रारीनंतर नर्सला अटक 

या प्रकरणानंतर युवकाला मोठा धक्का बसला. स्वच्छतागृहातून बाहेर येऊन आजोबांच्या वॉर्डमध्ये गेला. २१ जून रोजी नर्सने विनयभंग केल्याची तक्रार केली. तक्रारीनंतर दोन दिवसांनी पोलिसांनी नर्सला अटक केली. इस्पितळाने नर्सला निलंबित केले व ड्युटीवरून काढले. त्यानंतर न्यायालयाने सुनावणीनंतर नर्सला शिक्षा सुनावली.

दरम्यान, सिंगापूरमध्ये विनयभंगाच्या घटना गांभीर्याने घेतल्या जातात. शिक्षा म्हणून तुरुंगवास व चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावली जाते.


हेही वाचा