
नवी दिल्ली : गोव्यासहीत देशातील नोकरीच्या शोधासाठी असलेल्या युवकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. भारतीय रेल्वेत (Indian Railway) तब्बल ८ हजार, ८०० जागांसाठी (8 thousand 800 post) कर्मचारी भरतीची घोषणा केली आहे. खाली असलेल्या विविध जागा या मेगाभरतीतून (Job opportunity) भरण्यात येणार आहेत.
स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन व्यवस्थापक, ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टाइपिस्ट, ज्येष्ठ कारकून कम टायपिस्ट, मुख्य कमर्शियल तिकीट पर्यवेक्षक (सुपरवायजर) इत्यादी मिळून ५८१० जागांचा समावेश आहे. ट्रेन्स क्लर्क (लिपिक), अकाऊंट्स क्लर्क कम टाइपिस्ट, ज्युनियर क्लार्क कम टाइपिस्ट, अकाऊंट्स क्लर्क कम टाइपिस्ट मिळून ३०५८ जागा भरण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या साइटवर किंवा www.rrbapply.gov.in लिंक पहावी.