पर्यटन खात्याने ठोठावला ५० हजारांचा दंड

पणजी : पर्यटन खात्याकडून (Tourism Department) मान्यता न घेताच करंजाळे समुद्रकिनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय ओशियनमॅन इवेंटचे (International Oceanman Event) आयोजन केल्याबद्धल पर्यटन खात्याने मुंबईतील आयोजक कपिल अरोरा (kapil Arora) याना ५० हजारांचा दंड (Fifty Thousand Fine) ठोठावला आहे. पणजी पोलिसांनी यापूर्वीच आयोजकांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
करंजाळे समुद्रकिनाऱ्यावर गेल्या रविवारी ओशियनमॅन इवेंटचे आयोजन केले होते. या इवेंटमध्ये विविध प्रकारच्या जलतरण स्पर्धांचे आयोजन केले जाते. स्पर्धांना सुरवात झाली असता स्थानिक मच्छीमाऱ्यांनी विरोध केला. यामुळे समुद्रकिनाऱ्यावर तणाव निर्माण झाला. घटनास्थळी पोलिस पोचल्यानंतर त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली. मात्र विरोधामुळे हा इवेंट मध्येच रद्द करण्याची पाळी आयोजकांवर आली.
जीसीझेडएमए व जिल्हाधिकाऱ्यांकडून परवाना घेतल्याचा दावा आयोजकांनी तेव्हा केला होता. तरी पर्यटन खाते, पणजी महापालिकेचा परवाना आयोजकांकडे नव्हता. पर्यटन खात्याने आता कारवाई करताना ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.