कंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यास परवानगी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
कंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यास परवानगी

पणजी : सरकारने (Government) विविध खात्यांना त्यांच्याकडे कार्यरत असणाऱ्या विद्यमान कंत्राटी कर्मचाऱ्यांना (Contract basis Staff) मुदतवाढ (extension ) देण्याची परवानगी दिली आहे. खात्यांना त्यांच्याकडे ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कंत्राटावर असलेल्या अथवा आउट सोर्स केलेल्या एमटीएस कर्मचाऱ्यांना खात्याच्या आवश्यकतेनुसार अथवा कमाल ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देता येईल. यासाठी संबंधित प्रशासकीय विभागाच्या मंत्र्यांच्या मान्यता असणे आवश्यक आहे. कार्मिक खात्याने नुकताच याबाबत आदेश जारी केला आहे.

आदेशानुसार, मुदतवाढ देण्यापूर्वी खाते प्रमुखांना अशा कंत्राटी नियुक्तीची आवश्यकता तपासणे गरजेचे आहे. कंत्राटी नियुक्त्यांना मुदतवाढ देण्यापूर्वी खाते प्रमुखांनी मंजूर जागातील रिक्त जागा नियमितपणे भरण्यासाठी गोवा कर्मचारी निवड आयोग, गोवा लोकसेवा आयोगाकडे पाठवल्या जातील याची खात्री करणे आवश्यक आहे. याशिवाय आउसोर्स करण्यात आलेले ऑफिस बॉय, मेसेंजर आणि ड्रायव्हर, एलडीसी, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनो टायपिस्ट, सचिव इत्यादींना देखील मुदतवाढ देता येणार आहे. 

विद्यमान कंत्राटी अथवा आउटसोर्स एमटीएस कर्मचाऱ्यांच्या ३१ ऑक्टोबर, २०२६ नंतरच्या मुदतवाढीबाबतचे प्रस्ताव मूल्यांकनासाठी प्रशासकीय सुधारणा विभागाकडे पाठवले जातील. त्यानंतर, ते मंजुरीसाठी कार्मिक आणि वित्त विभागाकडे पाठवले जातील असे आदेशात स्पष्ट केले आहे.