भाऊबीज ठरली अखेरची; हंसापूर येथे अपघातात युवक ठार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
भाऊबीज ठरली अखेरची; हंसापूर येथे अपघातात युवक ठार

 पेडणे : महाराष्ट्रातून (Maharshtra)  गोव्यात (Goa) भाऊबीजेसाठी आलेला युवक अपघातात ठार झाला. हंसापूर येथे दुचाकीच्या झालेल्या स्वयं अपघात ऋषिकेश बापूजी दळवी (२० वर्षे)  हा मृत्यू पावला. (Youth Died in Accident)  विळवडे येथील हा युवक गोव्यात बहिणीकडे भाऊबीजेची ओवाळणी स्वीकारून परत जात होता. त्यावेळी हंसापूर येथे हा अपघात घडला.  

ऋषिकेश हा २६ ऑक्टोबर रोजी गोव्यात आपल्या बहिणीकडे दुपारी भाऊबीजेसाठी आला होता. बहिणीने भाऊबीजेची केलेली ओवाळणी ही त्याच्यासाठी शेवटची भाऊबीज ठरली. सायंकाळी उशिरा तो घरी व‌िलवडे येथे परतत असताना मुसळधार पावसात रस्त्याचा अंदाज न आल्याने झाडाला दुचाकी धडकून त्याचा जागीच मृत्यू झाला.

मोपा पोलिसांनी पंचनामा केला व पुढील प्रक्रिया केली.