रेल्वे प्रवासात २.८१ लाखांचा ऐवज चोरला, वास्को रेल्वे पोलिसांत तक्रार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
रेल्वे प्रवासात २.८१ लाखांचा ऐवज चोरला, वास्को रेल्वे पोलिसांत तक्रार

वास्को : रेल्वे (Railway) प्रवासादरम्यान ३५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम मिळून एकूण २.८१ लाख रुपये (2.81 lakh)  किंमतीचा ऐवज अज्ञातानी चोरला. (Theft) सोन्याचे दागिने (Gold Ornaments) व रोख रक्कम असलेली पर्स चोरून नेली. याप्रकरणी नवे वाडे येथील गुलाम अहमद रझा मुल्ला यांनी वास्को रेल्वे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, पोल‌िसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची आई आपल्या कुटुंबासमवेत २२ सप्टेंबर रोजी गोवा एक्सप्रेसने प्रवास करीत होती. त्यांनी बेळगाव रेल्वे स्थानकात गाडीत प्रवेश केला होता. वास्को रेल्वे स्थानकात पोहोचल्यावर त्या उठल्या तेव्हा त्यांची काळ्या रंगाची बॅग गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. या बॅगेमध्ये सुमारे २.८० लाख किंमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच १ हजार रुपये रोख रक्कम होती. वास्को रेल्वे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक कृष्णा ताल्पी तपास करीत आहेत.