
पणजी : इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक असिस्टन्समध्ये (प्रोव्हेदोरिया) (Provedoria) ६६ पदांची (66 Government Post) भरती केली जाणार आहे. यातील सर्वाधिक २१ पदे ही केअर टेकरची आहेत. १४ पदे ही स्वयंपाकीची आहेत. इच्छुकांनी १३ नोव्हेंबरला दुपारी ३ पूर्वी अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज www.ipagoa.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. तसेच उमेदवारांकडे १५ वर्षांचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
प्रोव्हेदोरियामध्ये एमटीएसची १०, एलडीसीची १०, सहाय्यक नर्सची ८, सहाय्यक स्टुअर्डची ३ पदे भरली जातील. केअर टेकर पदासाठी उमेदवार १० वी उत्तीर्ण किंवा आयटीआय मधून समतुल्य अभ्यासक्रम केलेला असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त सरकारी संस्थेमधून सहा महिन्यांचा होम नर्सिंग कोर्स तसेच सहा महिन्यांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. केअर टेकरच्या एकूण २१ पदांपैकी १० आरक्षित असणार आहेत.स्वयंपाकी (कुक) साठीच्या १४ पैकी ६ आरक्षित असतील. यासाठी १० वी उत्तीर्ण किंवा आयटीआय अभ्यासक्रम तसेच सहा महिन्यांचा प्रमाणपत्र कोर्स तसेच सहा महिन्यांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. एमटीएस पदासाठी १० वी उत्तीर्ण किंवा आयटीआय अभ्यासक्रम केलेलला असणे आवश्यक आहे. एलडीसीच्या १० पैकी ६ पदे आरक्षित असतील. यासाठी १२ उत्तीर्ण तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सहाय्यक नर्स पदासाठी १२ वी उत्तीर्ण, मिडवायफरी नर्स कोर्स केलेला असणे आवश्यक आहे. यातील ८ पैकी ४ पदे आरक्षित आहेत. सहाय्यक स्टुअर्डच्या पदासाठी १२ उत्तीर्ण किंवा समतुल्य पात्रता , संगणक ज्ञान तसेच एका वर्षाचा फील्ड वर्कर म्हणून अनुभव असणे आवश्यक आहे. एमटीएस आणि केअरटेकर पदी निवड झालेल्या व्यक्तीला अंथरुणावर असलेल्या वृद्ध रहिवाशांची सेवा करणे आवश्यक आहे. केवळ पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत असे आवाहन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक असिस्टन्सने केले आहे.