अग्निशामक दलाने वाचवले प्राण

पणजी : रायबंदर (Raibandar) येथे ३५ फिट उंचीवर बिर्लमाडावर (birlamadd) एक घुबड (barn owl) अडकून पडले. जुने गोवा अग्निशामक दलाने महत्प्रयासाने या घुबडाची सुटका केली.
रायबंदर येथे बिर्लमाडावर अडकून पडलेल्या या घुबडाला शनिवारी स्थानिकांनी पाहिले. त्यानंतर यासंदर्भात अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाने शिडी आणून या घुबडाची सुटका केली. बिर्लमाडामध्ये अडकल्याने सुटका करून घेण्यासाठी घुबडाने बरीच धडपड केली. जुने गोवे अग्निशामक दलाचे 'फायर स्टेशन' प्रमुख रोहिदास परब यांच्या मार्गदर्शनाखाली चार जणांचे पथक रायबंदर येथे रवाना झाले. परब यांनी अडकलेल्या या घुबडाला बाहेर काढले. अर्धा तास 'रेस्क्यू ऑपरेशन' चालले. सुटका करताच घुबडाने लगेच आकाशी झेप घेतली.