धक्कादायक कारण आले समोर

सांगे : सांगेत सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात (Higher Secondary) ‘फॉल सीलिंग’ कोसळून पाच विद्यार्थी (Student) जखमी झाले. या घटनेत गंभीर दुखापत झालेल्या निकिता खरात या विद्यार्थीनीला मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा इस्पीतळात दाखल करण्यात आले आहे. सीलिंग कोसळण्याची ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. माकडाने उडी मारल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
सभागृहात ही घटना घडली. अचानक छताचे ‘फॉल सीलिंग’ पडल्यानंतर विद्यार्थ्यांना धक्का बसला. या घटनेत पाच विद्यार्थी जखमी झाले. गंभीर दुखापत झालेल्या निकिता खरात या विद्यार्थीनीला मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा इस्पीतळात दाखल करण्यात आल्याची माहिती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यानी दिली.
दोन दिवसांत दुसरी घटना
दरम्यान, पर्ये, सत्तरी येथेही काल (गुरुवारी) नुकत्याच करण्यात आलेल्या सरकारी प्राथमिक शाळेतील छताला लावण्यात आलेला पंखा कोसळल्याने एक विद्यार्थिनी जखमी झाली होती. त्यानंतर सांगे येथे ही दुसरी घटना घडली आहे. पर्ये येथे घडलेल्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. सांगे येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात छताचे ‘फॉल सीलिंग’ कोसळण्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.