मुंबई: महाराष्ट्रावर 'शक्ती' चक्रीवादळाचे संकट! गुजरातहून कोकणाकडे सरकतेय;

सिंधुदुर्गपर्यंत ‘हाय अलर्ट’ : गोव्यात अलर्ट नाही तरी मच्छीमारांनी सावधगिरी बाळगावी

Story: वेब न्यूज गोवन वार्ता |
04th October 2025, 11:20 am
मुंबई: महाराष्ट्रावर 'शक्ती' चक्रीवादळाचे संकट! गुजरातहून कोकणाकडे सरकतेय;

मुंबई: अरबी समुद्रात तयार झालेले ‘शक्ती’ वादळ गुजरात किनारपट्टीवरून महाराष्ट्राकडे कुच करीत आहे. हवामान खात्याने मुंबईसहीत महाराष्ट्रात ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.  चक्रीवादळ जलदगतीने महाराष्ट्राचा किनारा गाठण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. पुढील २४ तासांत वादळ रौद्ररुप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकण, मराठवाड्यासहीत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पर्जनवृष्टी होणार आहे. हवामान खात्याने सिंधुदुर्गपर्यंत ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.

गुजरात व महाराष्ट्रातील मच्छिमारांनी कुठलाही धोका न पत्करता समुद्रापासून दूर रहावे अशी सूचना ही देण्यात आली आहे. ३ ते ७ ऑक्टोबरपर्यंत वादळाचा प्रभाव असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा सध्या तरी गोव्याला अलर्ट नसल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. तरी मच्छीमारांनी सावधगिरी बाळगावी असे सूचित करण्यात आले आहे.   

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना वादळाचा  धोका आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत ४५ ते ५५ किमी प्रतीतास वेगात वारे वाहणार आहे. ताशी ६५ किम‌ी पर्यंत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. 

..

हेही वाचा
सर्व पहा