हणजूण समुद्रकिनारी बुडून एकाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
हणजूण समुद्रकिनारी बुडून एकाचा मृत्यू

म्हापसा : हणजूण समुद्रकिनारी दगडावर घसरून समुद्राच्या पाण्यात पडल्याने अज्ञात व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला.

ही दुर्घटना बुधवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली होती. मृतदेह गुरुवारी सकाळी ११ वा. सुमारास आढळून आला. घटनास्थळी समुद्रकिनारी दगडावर जाऊन तो मौजमस्ती करत होता. त्यावेळी त्याचा पाय घसरुन तो दगडांवरुन खाली कोसळला. तिथेच त्याचा बुडून मृत्यू झाला.

सकाळी काही पर्यटक समुद्रकिनारी या दगडांवर सेल्फी घेत होते. तेव्हा त्यांच्या निदर्शनास हा मृतदेह पडला. त्यांनी जीवरक्षक व हणजूण पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा