भाजपचे ज्येष्ठ नेते विजय कुमार मल्होत्रा कालवश

वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Story: वेब न्यूज, गोवन वार्ता |
7 hours ago
भाजपचे ज्येष्ठ नेते विजय कुमार मल्होत्रा कालवश

नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते तथा दिल्ली भाजपचे प्रथम अध्यक्ष प्रा. विजय कुमार मल्होत्रा (९३ वर्षे) यांचे दिल्लीतील एम्स इस्पीतळात मंगळवारी सकाळी निधन झाले. दिल्ली भाजपचे पहिले अध्यक्ष असलेल्या मल्होत्रा यांच्या निधनाबद्दल भाजपने पत्रक जारी करीत दु:ख व्यक्त केले आहे. 

ते बरीच वर्षे आजारी होते. एम्स इस्पीतळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले. ते दिल्लीतून पाच वेळा खासदार तर दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राजधानी दिल्लीत पक्षाचे एक मुख्य चेहरा होते. दिल्ली भाजपने पत्रक जारी करून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबरोबरचे एक पुर्वीचे छायाचित्र शेअर करून दु:ख व्यक्त केले आहे. पीएम मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, ते जमिनीशी जोडले गेलेले नेते होते. 

एम्स दिल्लीच्या मिडिया विभागाच्या प्रमुख डॉ. रीमा दादा यांनी मंगळवारी सकाळी एक प्रेस रिलीज जारी करून वरिष्ठ नेता विजय कुमार मल्होत्रा (९३ वर्षे) यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. 

दिल्ली भाजपने सांगितले की, विजय कुमार मल्होत्रा यांचे पार्थ‌िव शरीर सकाळी ८.४५ वाजता त्यांच्या ‌२१, गुरुद्वारा रकाबगंज रोड येथे आणले जाणार आहे व तेथे लोक अंतिम दर्शन करू शकणार आहेत.

हेही वाचा