मुंबई : आयफोनसाठी कायपण! Gen Z कर्मचाऱ्याचे राजीनाम्याचे 'कॅज्युअल' पत्र व्हायरल

कारण वाचून हसू आवरणार नाही

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th September, 10:23 am
मुंबई : आयफोनसाठी कायपण! Gen Z कर्मचाऱ्याचे राजीनाम्याचे 'कॅज्युअल' पत्र व्हायरल

मुंबई: नोकरी सोडण्याचे कारण काय असू शकते बरे ? पगारात वाढ नाही, कामाचा ताण किंवा चांगली संधी... पण सध्या एका 'जेन-झी' (Gen Z) कर्मचाऱ्याने नोकरी सोडण्याचे दिलेले कारण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे कारण इतके मजेशीर आणि प्रामाणिक आहे की, ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही!




सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये एका कर्मचाऱ्याने थेट आपल्या वरिष्ठांना राजीनामा पत्र लिहिले आहे. त्यात तो म्हणतो, 'आदरणीय सर, बाजारात आयफोन १७ आला आहे. मात्र, सध्याच्या पगारात माझा ईएमआय भरणे अवघड आहे. त्यामुळे, जास्त पगाराच्या पॅकेजसाठी मी दुसरी नोकरी स्विच करत आहे. आपला विनम्र, झेन-झी.'



हे पत्र खरे आहे की केवळ एक विनोद आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, या 'कॅज्युअल' राजीनामा पत्राने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक युजर्सनी यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'सॅमसंग हे आयफोनपेक्षा जास्त अप्रतिम आहे'. तर दुसऱ्याने कमेंट केली, 'नाद करा पण जेन-झीचा कुठे'. या पोस्टमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.


Apple iPhone 17, iPhone 17 Pro, and Air hot take - GSMArena.com news


या पत्राने आयफोनच्या क्रेझची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. १९ सप्टेंबर रोजी आयफोन १७ लाँच झाला, तेव्हा मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील ॲपल स्टोअरबाहेर मोठी गर्दी झाली होती. एक व्यक्ती तर आयफोन घेण्यासाठी चक्क अहमदाबादमधून मुंबईत आला होता! यावरूनच, आयफोनचे फॅड किती आहे, हे दिसून येते.


Gen Z Employee Quits Job for iPhone 17 Resignation Letter Viral

हेही वाचा