सातवा वेतन आयोग, दैनिक मजुरीवरील कर्मचाऱ्यांचा बढतीसाठी लढा
पणजी: कदंब ट्रान्सपोर्टकॉर्पोरेशनच्या (केटीसीएल)व्यवस्थापनानेकर्मचाऱ्यांच्या प्रलंबितमागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचाआरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यातआला आहे. त्यामुळे,केटीसीएल चालक आणिकर्मचाऱ्यांनी पर्वरी येथीलमुख्य कार्यालयासमोर एकदिवसीयउपोषण केले. व्यवस्थापनाच्याअपयशामुळे कर्मचाऱ्यांनीहे आंदोलनाचे पाऊल उचललेआहे.
कर्मचाऱ्यांनीकेलेल्या प्रमुख मागण्यांमध्येसातव्या वेतन आयोगाचे थकीतवेतन त्वरित देण्याची मागणीकेली आहे. केटीसीएलकर्मचाऱ्यांचे ३४ महिन्यांचेथकीत वेतन तत्काळ अदा करावे,अशी त्यांची मागणीआहे. तसेच, ज्यादैनिक मजुरीवरील चालक व वाहकांनीपाच वर्षे सेवा पूर्ण केलीआहे, त्यांची सेवानियमित करावी. त्यांनास्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणेसर्व वेतन आणि लाभ मिळावेत,असे त्यांनी स्पष्टकेले.
बढतीसहईपीएफओचा मुद्दा
सर्वकर्मचारी, मेकॅनिक,वाहक (कंडक्टर),चालक आणि लिपिक यांनाज्येष्ठतेनुसार बढत्या देण्यातयाव्यात. कोणत्याहीप्रकारचा भेदभाव करू नये.१२ कर्मचाऱ्यांच्यावेतन त्रुटी दुरुस्त करूनत्यांना दोन वेतनवाढीचा लाभद्यावा, ही मागणीजुलै २०१९ पासून प्रलंबितआहे. २००९ पासूनमार्च २०२५ पर्यंतचे सर्वईपीएफओ योगदान तातडीने भरावे,अशी मागणी त्यांनीकेली आहे. यामध्येनिवृत्त कर्मचाऱ्यांचाहीसमावेश आहे.
कंत्राटीईव्ही चालकांच्यासमस्या
कंत्राटदारांमार्फतकार्यरत असलेल्या इलेक्ट्रिकव्हेईकल (ईव्ही)चालकांच्या समस्याहीकर्मचाऱ्यांनी मांडल्या.कंत्राटी ईव्हीचालकांच्या मागणीची तातडीनेपूर्तता व्हावी. त्यांच्याविश्रांती कक्षाची समस्यायुद्धपातळीवर सोडवून त्यांनारजा आणि बोनस यांसारख्या मानवीसेवाशर्ती लागू कराव्यात.कंत्राटदारांमार्फतचालवल्या जाणाऱ्या सर्व ईव्हीबससाठी केटीसीएलच्या चालकांचावापर करावा. तसेच,सर्व इलेक्ट्रिक बसचीमालकी, संचालन आणिदेखभाल करण्याची जबाबदारीकेटीसीएलकडे असावी, अशीमागणीही त्यांनी केली.शेवटी, केटीसीएलमध्येसमाविष्ट झालेल्या सर्वचालकांना केटीसीएलचा निळागणवेश त्वरित देण्यात यावा,अशी मागणी आहे.