कर्मचारी भरती आयोगामार्फत एलडीसी/रिकवरी क्लार्क पदाची भरती
पणजी : कर्मचारी भरती आयोगामार्फत एलडीसी/रिकवरी क्लार्क पदांसाठी सीबीटीतील गुणांच्या आधारे विविध गटात मिळून २१५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आयोगाने निवड यादी तसेच प्रतिक्षा यादीही जाहीर केली आहे. ही पदे भरण्यासाठी आयोगाने १३ डिसेंबर २०२४ रोजी जाहीरात दिली होती. जाहीरातीनंतर ९ महिन्यांनी निवड यादी जाहीर झाली आहे.
विविध खात्यात मिळून एलडीसीची २१५ पदे भरण्यासाठी जाहीरात देण्यात आली होती. निवड झालेल्या २१५ उमेदवारांमध्ये सर्वसामान्य गटातील १०२, ओबीसी ५१, एसटी २६, एससी २, इडब्लूएस २२ (आर्थिकदृष्ट्या मागास), क्रीडापटू १, एक्ससर्वीसमॅन ३ व दिव्यांग ८ उमेदवार आहेत. सविस्तर यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एलडीसींसह याच वेळी ज्युनियर स्टेनोग्राफरांची पदे भरण्यासाठीही जाहीरात देण्यात आली होती. ही पदे भरण्याची प्रक्रीया सुरू आहे.