खटल्याचा निकाल लागेपर्यंत कोणतीही विधाने करू नयेत

डिचोली न्यायालयाकडून आपचे नेते संजय सिंह यांना निर्देश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 11:37 pm
खटल्याचा निकाल लागेपर्यंत कोणतीही विधाने करू नयेत

डिचोली : सुलक्षणा सावंत यांनी ‘आप’चे नेते संजय सिंह यांच्या विरोधात दाखल केलेल्या १०० कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्यात डिचोली न्यायालयाच्या न्यायाधीश अनुराधा आंद्राद यांनी ‘आप’ नेते संजय सिंह यांना आदेश दिला की, त्यांनी खटल्याचा निकाल लागेपर्यंत सुलक्षणा सावंत यांची प्रतिमा मलिन करणारी सार्वजनिक विधाने करू नयेत.
संजय सिंह यांना खटल्याचा निर्णय येईपर्यंत सोशल मीडिया किंवा व्हाट्सअॅप, फेसबुक, यूट्यूब, एक्स (ट्विटर) सारख्या इतर प्लॅटफॉर्मवर सावंत यांची प्रतिमा मलिन करणारी कोणतीही विधाने करण्यास मनाई करण्यात आली आहे.
न्यायालयाने डिसेंबर २०२५ मध्ये पुढील सुनावणी निश्चित केली आहे. सुलक्षणा सावंत यांच्यावतीने महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आणि ज्येष्ठ वकील सुनील मनोहर, अ‍ॅड. प्रल्हाद परांजपे, अ‍ॅड. संजय सरदेसाई, अ‍ॅड. अनिकेत कुंडे आणि अ‍ॅड. तीर्थ पवार यांनी काम पाहिले. तर संजय सिंह यांच्यावतीने अ‍ॅड. सुरेल तिळवे आणि अ‍ॅड. सी नाईक यांनी काम पाहिले.

हेही वाचा