आंध्रप्रदेश: व‌रिष्ठांकडून अपमान : पोलीस शिपाई बनला आयपीएस अधिकारी

Story: वेब न्यूज । गोवन वार्ता |
2 hours ago
आंध्रप्रदेश: व‌रिष्ठांकडून अपमान : पोलीस शिपाई बनला आयपीएस अधिकारी

आंध्रप्रदेश: वरिष्ठांनी आपल्या हाताखाली कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाचा अपमान केला. पोलीस शिपायाने आयपीएस (IPS) अधिकारी बनून त्याचा बदला घेतला. उदय कृष्ण रेड्डी यांचा पोलीस शिपाई ते आयपीएस अधिकारी बनण्यापर्यंतचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. 

पोलीस शिपाई ते आयपीएस अधिकारी बनून आदर्श ठेवणारा हा युवक आंध्र प्रदेशातील एका सामान्य गावात जन्माला आला. लहानपणीच आई वडिल गमवावे लागल्याने दु:खाचा डोंगर कोसळला तरी जिद्दीने या युवकाने हे यश प्राप्त केले. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपल्यानंतर आजीने सांभाळ केला. आजी भाजी विकायची त्यावर त्यांची रोजीरोटी चालायची. 

उदय रेड्डी यांचे आयुष्य तसे संघर्षमय, चढउताराने भरलेले होते. हातावर पोट असल्याने;  उदय यांनी दहावीपर्यंतच शिक्षण घ्यावे, अशी आजीची इच्छा होती. मात्र, तिने कधी त्याला शिक्षण घेण्यापासून रोखले नाही. उदयला आपण डॉक्टर व्हावे असे वाटायचे. मेडिकल लॅब टेक्न‌िशियन व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र,  आर्थ‌िक अडचणींमुळे त्यांना ते जमले नाही.  हार न मानता जिद्दीने काही तरी मोठे करून दाखवावे यासाठी त्याचे प्रयत्न सुरू झाले.  आर्थ‌िक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी ही त्याची धडपड सुरू होती.

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करीत असताना पोलीस शिपाई म्हणून नोकरी मिळाली. २०१३ ते २०१८ पर्यंत आंध्रप्रदेश पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी केली. नोकरीत असताना २०१८ मध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी केलेला कथित अपमान त्याच्या जिव्हारी लागला. त्यातूनच यूपीएससी सिव्ह‌िल सर्व्हिसेस परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचा चंग बांधला. नोकरीचा राजीनामा देऊन तयारीला लागले.

  • खडतर मेहनत करून यूपीएसी परीक्षा उत्तीर्ण झाले. उदय रेड्डी २०२३ मध्ये पहिली यूपीएससी उत्तीर्ण झाले. त्यात त्यांना ७८० रॅंक प्राप्त झाला. यावर समाधान न मानता पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले. २०२४ मध्ये यूपीएससी (UPSC) सीएसई (CSE) परीक्षेत ३५० वा रॅंक मिळवला. इडब्ल्यूएस (EWS) श्रेणी अंतर्गत आयपीएस केडरमध्ये स्थान मिळवले. उदय यांचा पोलीस कॉन्स्टेबल ते आयपीएस अधिकारी बनण्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. 
हेही वाचा