मध्यप्रदेश : कफ सिरप घेतले, किडनी झाली निकामी : सहा लहान मुले दगावल्याने खळबळ

Story: वेब न्यूज । गोवन वार्ता |
02nd October, 12:23 pm
मध्यप्रदेश : कफ सिरप घेतले, किडनी झाली निकामी : सहा लहान मुले दगावल्याने खळबळ
  • छिंदवाडा:  सर्दीचा त्रास होऊ लागल्याने सहा लहान मुलांना कफ सिरप पाजले. हे कफ सिरपच ६ मुलांचे काळ ठरले. कफ सिरप घेतल्यानंतर मुत्रपिंड (Kideny) निकामी झाल्याने सह मुले दगावण्याची ही घटना मध्य प्रदेश येथील छिंदवाडा येथे घडली. कफ सिरप पाजल्यानंतर सहा बालकांच्या किडन्या निकामी झाल्याने, ही मुले मृत्यू पावल्याचे बायोप्सी अहवालात नमूद करण्यात आले आहे. १५ दिवसांत सहा बालके मरण पावल्यानंतर दोन कफ सिरप वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

  • मृत्यू पावलेली सर्व मुले ५ वर्षांखालील आहेत. ही मुले खोकला, तापाने त्रस्त होती. स्थानिक डॉक्टरने तपासणी केल्यानंतर एक सिरप, इतर औषध लिहून दिले. सिरप व औषधे घेऊन ही मुले बरी झाली. मात्र, त्यानंतर मुलांना परत ताप येऊ लागला व लघवी होण्यास त्रास व्हायला लागला तर काही मुलांची लघवी पूर्णपणे थांबली.
  • काही दिवसांनंतर या मुलांचे स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले व किडन्या निकामी झाल्या. पालकांनी तात्काळ मुलांना इस्पीतळात नेले. मात्र, उपचाराला दाद न देता मुले मृत पावली. त्यानंतर डॉक्टरांनी बायोप्सी केल्यानंतर या बालकांच्या किडन्या निकामी झाल्याचे उघड झाले. बायोप्सी अहवालात मुलांच्या शरीरात डायथीलेन ग्लायकाॅल कंटॅमिनेशन हे टाॅक्सिक केमिकल सापडले. या घटनेनंतर छिंदवाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन कफ सिरपवर बंदी घातल्याचे जाहीर केले.
हेही वाचा