जीपीएससी मार्फत जेएसओ या पदासाठी आता प्री स्क्रिनिंग होऊ घातलेली आहे. यातील परीक्षांसाठी हे कोर्ट जजमेंट्स उपयोगी पडतात. कारण या परीक्षेत या विषयावर प्रश्न आहेत. तसे बघितले तर लॅडमार्क जजमेंट्स शेकडो आहेत. लिस्ट युट्यूबवर देखील मिळते याचा वापर करावा. टेक्नोलॉजीचा वापर करुन अभ्यास करता येतो.
युपीएससीच्या मेन्स परीक्षेमध्ये जनरल स्टडीजच्या लेखी परीक्षेत हल्लीच्या सुप्रिम कोर्टातील निकालांवर सुद्धा दिर्घोतरी प्रश्न असतात. हल्ली इंटरनेटवर पीडीएफ् स्वरूपात याचे पूर्ण जजमेंट उपलब्ध असते. ते जजमेंट म्हणजे एक प्रकारे मोठे पुस्तकच असते. ज्याच्यामध्ये निकाल जो दिलेला आहे तो कोणकोणत्या गोष्टींच्या आधारे दिला आहे, कोणत्या जुन्या खटल्यांचा आधार घेतला, त्या-त्या वेळेस त्या-त्या न्यायधिशांनी कशी मते व्यक्त केली, पक्षकारांनी आपापले मुद्दे, पुरावे, साक्षी कशाप्रकारे नोंदवलेल्या आहेत याचा संपूर्ण गोषवारा असतो. पक्षकारांनी कोणत्या शब्दाचा कसा अर्थ घेतला व कोर्टसमोर विचार करायला ठेवला, ज्याला 'इंटरप्रिटेरान' असे म्हणतात असे मुद्दे स्वच्छ आणि स्पष्टपणे नमूद केलेले असतात. त्याचबरोबर विरुद्ध पक्षाने पण कसे मुद्दे मांडलेत याचाही गोषवारा असतो. ती केस नीट समजून घेण्यासाठी हे सर्व वाचन अत्यंत आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा ऊहापोह हा दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये करावा लागतो. उदा. ‘मरठा आरक्षण’ हा विषय. या विषयाचा निकाल शेकडो पानांमध्ये मांडलेला आहे. मराठा या शब्दाचा अर्थ, मराठा या जातीचा अर्थ, त्याचे उगमस्थान, स्थित्यंतरे, घटनेतील कलमांशी याचा संबंध लावताना पुढे कसे कसे होत गेले याचा उलगडा होतो व ती माहिती खूप 'इंटरेस्टींग' असते. याने जनरल नॉलेज तर वाढतेच परंतु 'केस' नीट कळते. त्यामुळे अश्या प्रकारच्या केस जजमेंटच्या वाचनाचा विद्यार्थ्याला खूप फायदा होतो.
हातातील मोबाईलच्या इंटरनेटचा यासाठी नक्की फायदा होतो. गेल्या ५ वर्षात ३७० कलम, रामजन्मभूमी खटला, मराठा आरक्षण, महाराष्ट्रातील सत्तातरांचा खेळ, तीन तलाक असे अनेक खटले मार्गी लागले. यांचे अवश्य वाचन करावे. त्याचबरोबर जुने गाजलेले खटले जसे की भोपाळ वायू दुर्घटना, अडलट्री, नॉमिनी या शब्दाचा अन्वयार्थ असे अनेक गाजलेल्या प्रकरणांचा नीट अभ्यास, वाचन व मनन करावे. कारण पुढे 'इंटरव्ह्यू' साठी सुद्धा या विषयांची माहिती उपयोगी पडते. त्यामुळे UPSC च्या उमेदवारांनी या गोष्टी आवर्जून वाचाव्यात. सुप्रिम कोर्ट कोणत्याही गोष्टींचा किती बारकाईने विचार करते याचेही आपल्याला कौतुक वाटले तर नवल नाही. एस आर बोम्मई खटला, शहाबानो खटला व सुनावणी, केशवानंद भारती केस, ज्युडीशिअल रिव्ह्यु यासारखे लॅडमार्क जजमेंटस वाचून घ्यावेत. चॅट जीपीटी वर लँडमार्क जजमेंट्स ऑफ सुप्रिम कोर्ट' असे टाकले की सर्व केसेस आपल्याला उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांनी साधारणपणे कोणता खटला, कोणता विषय याचा एक चार्ट करावा व तो किमान ११ वेळा वाचावा म्हणजे पाठ होतो.
जीपीएससी मार्फत जेएसओ या पदासाठी आता प्री स्क्रिनिंग होऊ घातलेली आहे. यातील परीक्षांसाठी हे कोर्ट जजमेंट्स उपयोगी पडतात. कारण या परीक्षेत या विषयावर प्रश्न आहेत. तसे बघितले तर लॅडमार्क जजमेंट्स शेकडो आहेत. लिस्ट युट्यूबवर देखील मिळते याचा वापर करावा. टेक्नोलॉजीचा वापर करुन अभ्यास करता येतो. 'अल्लाउद्दीनचा जादुचा दिवा' हा जणू फोन बनलेला आहे. त्यामुळे याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास फायदा खूप होतो. जीपीएससी स्क्रिनिंग परीक्षेत या विषयावर एमसीक्यू पद्धतीने प्रश्न असतात. त्याचबरोबर लेखी पेपरमध्येसुद्धा या विषयावर प्रश्न विचारले जातात. ५ मार्कांचे आणि १० मार्कांचे प्रश्न असतात. जुने गाजलेले खटले हे भारतातील सर्व कोर्टांवर बंधनकारक असतात. यामुळे ज्ञानात तर भर पडतेच तसेच पुढे इंटरव्ह्यूमध्येही आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी यावर गंभीरपणे अभ्यास करावा.
अॅड. शैलेश कुलकर्णी
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)