हुळंद-खानापूर येथे अस्वलाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
हुळंद-खानापूर येथे अस्वलाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

बेळगाव : खानापूर तालुक्यातील हुळंद गावात गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या वासुदेव नारायण गावडे यांच्यावर रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास अस्वलाने हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात गावडे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले.

वासुदेव गावडे यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याने त्यांनी एक डोळा पूर्णतः गमावल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खानापर ब्लॉक काँग्रेसने याप्रकरणी वनखात्याला इशारा देत सांगितले की, योग्य उपचार न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. वनखात्याने हलगर्जीपणा न करता ताबडतोब सर्व उपचार करावेत अन्यथा खानापूर ब्लॉक काँग्रेस गप्प बसणार नाही. वनअधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. 

हेही वाचा