ब्रिटन : लंडनमध्ये 'अवैध-स्थलांतर' विरोधी मोर्चा, १ लाखाहून अधिक लोकांचा सहभाग

आंदोलकांद्वारे जाळपोळ सुरू; आतापर्यंत २५ लोकांना अटक, आकडा वाढण्याची शक्यता.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
55 mins ago
ब्रिटन : लंडनमध्ये 'अवैध-स्थलांतर' विरोधी मोर्चा, १ लाखाहून अधिक लोकांचा सहभाग

लंडन: ब्रिटनमध्ये अवैध स्थलांतरणाच्या विरोधात लंडनमध्ये 'युनाईट द किंगडम' या नावाने मोठी निदर्शने झाली, ज्यात जवळपास १.१० लाख लोक सहभागी झाले होते. ही रॅली उजव्या विचारसरणीचे नेते टॉमी रॉबिन्सन यांनी आयोजित केली होती.


London far-right rally draws over 100,000 with clashes breaking out : NPR


या निदर्शनांमध्ये टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी एका व्हिडिओद्वारे सहभाग घेतला. त्यांनी टॉमी रॉबिन्सन यांच्याशी संवाद साधताना "हिंसा तुमच्या दिशेने येत आहे. एकतर करा, लढा किंवा मरा," असे विधान केले. तसेच, त्यांनी ब्रिटनमध्ये सरकार बदलण्याची मागणी करत संसद बरखास्त करावी असे म्हटले. एकीकडे सबंध लंडनमध्ये आंदोलन सुरू होते तर याच वेळी, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आपल्या मुलासोबत लंडनच्या एमिरेट्स स्टेडियममध्ये फुटबॉल सामना बघत होते. सोशल मिडियावर देखील यावर अनेकांनी उपरोधात्मक टिप्पण्या केल्या. एकीकडे लंडन जळत आहे आणि देशाचा राज्यकर्ता फुटबॉल मॅच बघतोय, अशी खोचक टिप्पणी देखील एकाने रोमन सम्राट निरोचा संदर्भ देताना केली.

Far-right anti-immigration protests in London lead to clashes with police |  CNN


या निदर्शनांचा मुख्य उद्देश बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्याची मागणी करणे हा होता. या वर्षी २८ हजारहून अधिक स्थलांतरित इंग्लिश चॅनेलच्या मार्गे बोटीतून ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत.



दरम्यान, 'स्टँड अप टू रेसिझम' नावाच्या दुसऱ्या गटानेही जवळपास ५,००० लोकांसह विरोध प्रदर्शन केले. दोन्ही गट एकमेकांसमोर येऊ नयेत म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मात्र, ‘युनाईट द किंगडम’ मोर्चातील काही निदर्शकांनी पोलिसांचे अडथळे तोडून विरोधी गटाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही पोलिसांवर हल्ले झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १६०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते.


निदर्शकांनी ब्रिटन, अमेरिका आणि इस्त्राईलचे झेंडे फडकावले. काहींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' लिहिलेल्या टोप्याही घातल्या होत्या. पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत 'त्यांना परत पाठवा' असे फलकही झळकवण्यात आले.



या रॅलीत राष्ट्रवादी आणि इस्लामविरोधी विचारसरणीसाठी ओळखले जाणारे नेते टॉमी रॉबिन्सन, ज्यांचे खरे नाव स्टीफन यॅक्सली-लेनन आहे, यांनी हे आंदोलन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उत्सव असल्याचे म्हटले. फ्रान्सचे उजव्या विचारसरणीचे नेते एरिक जेमोर यांनीही भाषण दिले, ज्यात त्यांनी युरोपीय वंशाच्या लोकांच्या हक्कांविषयी चिंता व्यक्त केली. या हिंसाचारानंतर पोलिसांनी २५ पेक्षा जास्त लोकांना अटक केली असून, जाळपोळ करून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या अनेक उपद्रवी लोकांची ओळख पटवली आहे.

हेही वाचा