हत्तीने तेरेखोल नदी ओलांडलेली नाही : मुख्य वन संरक्षक

म्हणाले-हत्तीच्या हालचालींवर वन खात्याची नजर; नागरिकांना घाबरून न जाण्याचे केले आवाहन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
53 mins ago
हत्तीने तेरेखोल नदी ओलांडलेली नाही : मुख्य वन संरक्षक

पणजी : गोव्याच्या सीमेवर असलेल्या हत्तीने अद्याप तेरेखोल नदी ओलांडलेली नाही, त्यामुळे तो अद्यापही महाराष्ट्राच्याच हद्दीत असल्याचे गोव्याचे मुख्य वन संरक्षक नवीन कुमार यांनी स्पष्ट केले आहे. हत्ती गोव्याच्या हद्दीत नसल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.



कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याचे वन खात्याचे पथक महाराष्ट्र वन खात्याच्या संपर्कात असून, ते हत्तीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. हा हत्ती आपल्या कळपापासून चुकलेला असून तो बिथरलेला आहे. त्यामुळे लगेचच कोणतीही कृती करणे धोकादायक ठरू शकते. महाराष्ट्र वन खात्याचे पथक हत्तीला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्याचे प्रयत्न करत आहेत.



दरम्यान, मुख्य वन संरक्षक नवीन कुमार यांनी सीमेवरील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, मात्र घाबरून न जाण्याचा सल्लाही दिला आहे. लोकांनी केवळ शक्यता आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा