वास्को : धोकादायक इमारत पाडताना इतर घरांचे नुकसान; बायणावासीयांचा आक्षेप

मुरगाव पालिकेने दिले काम थांबवण्याचे निर्देश

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
वास्को : धोकादायक इमारत पाडताना इतर घरांचे नुकसान; बायणावासीयांचा आक्षेप

पणजी : बायणा येथील एक जुनाट निवासी इमारत पाडण्याच्या कामाला स्थानिक नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. बांधकाम सुरू असताना सिमेंटचे तुकडे उडून आजूबाजूच्या घरांचे छत फुटत असल्यामुळे नागरिकांनी हे काम तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. यामुळे मालमत्तेचे तसेच रहिवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले.


नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी कंत्राटदाराला तातडीने काम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. जोपर्यंत सुरक्षिततेचे योग्य उपाय योजले जात नाहीत, तोपर्यंत पाडकाम पुन्हा सुरू करू नये, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

हेही वाचा