टेक्नो वार्ता : घिब्ली आर्टनंतर एआयची नवी किमया! ‘नॅनो बनाना’ ट्रेंडची तरुणाईला भुरळ...

सिंपल प्रॉम्प्टद्वारे तुमच्या नॉर्मल फोटोतून तयार करा हटके फिगरिन्स!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
46 mins ago
टेक्नो वार्ता : घिब्ली आर्टनंतर एआयची नवी किमया! ‘नॅनो बनाना’ ट्रेंडची तरुणाईला भुरळ...

पणजी : तुम्हीही तुमच्या फोटोला अ‍ॅक्शन फिगर किंवा स्टुडिओ घिब्ली आर्टमध्ये बदलून पाहिलेय का? जर हो, तर इंटरनेटवर आता एक नवा एआय (AI) ट्रेंड धुमाकूळ घालतोय, ज्याचे नाव आहे ‘नॅनो बनानाट्रेंड! या ट्रेंडमध्ये तुम्ही तुमच्या फोटोला गुगल जेमिनीच्या एआय मदतीने एका सुंदर, वास्तववादी आणि लहान फिगरिनमध्ये बदलू शकता.

ही फिगरिन एकदम खरी असल्यासारखी दिसते. डाउनलोड करून प्रिंट घेऊन तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी ती ठेवू शकता. तुम्हालाही हा ट्रेंड फॉलो करून तुमच्या फोटोची फिगरिन बनवायची असेल, तर ही सोपी स्टेप-बाय-स्टेप गाइड नक्की फॉलो करा.

स्टेप-बाय-स्टेप गाइड

स्टेप १: तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर गुगल जेमिनी (Google Gemini) ओपन करा आणि तुमच्या क्रेडेन्शियल्सने लॉग इन करा.

स्टेप २: तुम्हाला ज्या फोटोची फिगरिन बनवायची आहे, तो फोटो अपलोड करा. एआयला तो अचूक डिटेक्ट करता यावा यासाठी फोटो स्पष्ट आणि हाय-रिझोल्यूशन असावा.

स्टेप ३: फोटो अपलोड झाल्यावर खालीलपैकी एक प्रोम्प्ट (Prompt) टाका.

जेमिनीला कोणता प्रोम्प्ट द्याल?

तुमचे काम अधिक सोपे करण्यासाठी गुगल जेमिनीने स्वतः X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर एक बेस्ट प्रोम्प्ट शेअर केला आहे. तो असा: “Create a 1/7 scale commercialised figurine of the characters in the picture, in a realistic style, in a real environment. The figurine is placed on a computer desk.”

या प्रोम्प्टमध्ये तुम्ही फिगरिनच्या आजूबाजूला कोणतेही घटक टाकू शकता, जसे की गोल ट्रान्सपरंट बेस, किंवा कॉम्प्युटर स्क्रीनवर तुम्ही फिगरिनचे 3D मॉडेलिंग करत आहात असे दाखवू शकता. याशिवाय, तुम्ही फिगरिनच्या बाजूला पॅकेजिंग बॉक्सची रचनासुद्धा सांगू शकता. थोडक्यात, तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीनुसार फिगरिन तयार करू शकता!

जेमिनी अजून काय काय करू शकते ?

एका फोटोतील वस्तू बदला : तुम्ही एका फोटोतील एखादी वस्तू काढू शकता किंवा नवीन वस्तू टाकू शकता.

दोन फोटोंना एकत्र जोडा : तुम्ही दोन फोटोमधील वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून एक नवीन फोटो तयार करू शकता.

१६-बिट आर्ट मोड्यूलमध्ये तयार करा : तुम्हाला तुमचा फोटो १६-बिट व्हिडिओ गेम कॅरेक्टरमध्ये बदलायचा असेल, तर तुम्ही ‘reimagine me as a 16-Bit Video Game character and put me in a 2D 16-bit platform video game,’ असा प्रोम्प्ट वापरू शकता. मग वाट कशाची बघताय ? चला सुरू करा.. 

हेही वाचा