नेपाळमध्ये सरकारचा भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीवरून तरुणाईचा उद्रेक

संसद भवनात घुसलेल्या आंदोलकांवर गोळीबार, १६ ठार तर 200 हून अधिक जखमी.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
नेपाळमध्ये सरकारचा भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीवरून तरुणाईचा उद्रेक

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हजारो तरुण आंदोलक थेट संसद भवन परिसरात घुसले, ज्यानंतर लष्कराने केलेल्या गोळीबारात किमान १६ जणांचा मृत्यू झाला, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. नेपाळच्या इतिहासात पहिल्यांदाच आंदोलकांनी संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न केल्याने देशात तणावाचे वातावरण आहे.


सोशल मीडिया बैन के खिलाफ हजारों प्रदर्शनकारी सड़कों पर हैं।


सरकारने ३ सप्टेंबर रोजी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती. या कंपन्यांनी नेपाळच्या दूरसंचार मंत्रालयाकडे नोंदणी केली नसल्याचे सरकारने सांगितले होते. देशात खोट्या बातम्या, सायबर गुन्हे आणि द्वेषपूर्ण भाषणे रोखण्यासाठी ही बंदी घालण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, या निर्णयाला १८ ते ३० वयोगटातील 'जेन-झी'ने तीव्र विरोध केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा त्यांचा आरोप आहे.


सोमवार को नेपाल के संसद भवन के बाहर पुलिस ने प्रदर्शनकारियों को रोकने के लिए आंसू गैस के गोले छोड़े।


केवळ सोशल मीडियावरील बंदीच नव्हे, तर देशातील वाढती बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोषही या आंदोलनामागचे प्रमुख कारण आहे. नेपाळमधील अनेक प्रसिद्ध कलाकार आणि माजी नेत्यांनीही या तरुणाईला पाठिंबा दिला आहे. देशातील युवकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.


एक प्रदर्शनकारी युवक ने आंसू गैस के कैन को वापस पुलिस की तरफ फेंका।


परिस्थिती हाताबाहेर गेल्याने काठमांडू जिल्हा प्रशासनाने प्रमुख भागात संचारबंदी लागू केली आहे. पोलिसांनीही आंदोलकांना पाहता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे नेपाळ सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा