नेपाळमध्ये आंदोलकांकडून काठमांडू विमानतळ लक्ष्य

अनेक नेत्यांची घरे जाळली, पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्याची मागणी कायम

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
नेपाळमध्ये आंदोलकांकडून काठमांडू विमानतळ लक्ष्य
नेपाळमध्ये सरकारच्या धोरणांविरोधात सुरू झालेले आंदोलन आता हिंसक झाले असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सोमवारी झालेल्या पोलीस कारवाईत कमीत कमी १९ आंदोलकांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या गंभीर परिस्थितीनंतर गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला आहे.
🔥
आंदोलकांकडून जाळपोळ आणि तोडफोड
संतप्त आंदोलकांनी नेपाळच्या राष्ट्रपतींचे खासगी निवासस्थान, पंतप्रधान के. पी. ओली यांचे कार्यालय आणि निवासस्थानावर हल्ला केला आहे. आंदोलकांनी काठमांडू विमानतळात घुसून तोडफोड आणि जाळपोळ केली. तसेच, अनेक मोठ्या नेत्यांची घरेही पेटवून दिली आहेत.
🇳🇵
राजधानीतील तणावपूर्ण स्थिती
सरकार विरुद्ध जनता
'केपी चोर, देश छोडो'च्या घोषणा
मंगळवारी काठमांडू, ललितपूरसह अनेक भागांमध्ये विद्यार्थ्यांनी संचारबंदी झुगारून 'भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करा' अशा घोषणा देत निदर्शने केली.
संचारबंदी लागू
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने काठमांडू, ललितपूर आणि भक्तपूर जिल्ह्यांमध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सैन्य तैनात
परिस्थितीचे गांभीर्य पाहता राजधानीत नेपाळी सैन्य तैनात करण्यात आले असून, त्यांनी संसद परिसराभोवतीच्या रस्त्यांचा ताबा घेतला आहे.
#NepalProtest #Kathmandu #CivilUnrest #NepalNews
हेही वाचा