दिल्लीसह ४ राज्यांतून ५ संशयित दहशतवादी अटकेत; आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th September, 10:55 am
दिल्लीसह ४ राज्यांतून ५ संशयित दहशतवादी अटकेत; आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आयसिसच्या एका स्लीपर सेल मोड्यूलचा पर्दाफाश केला आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये छापे टाकून पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) बनवण्यासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे.


पुलिस सूत्रों के मुताबिक, रांची से गिरफ्तार दानिश के ठिकाने से IED बनाने का सामान मिला है।


या संशयितांपैकी दोघे दिल्लीतून, तर एक मध्य प्रदेश, एक तेलंगणातील हैदराबाद आणि एक झारखंडच्या रांची येथून पकडण्यात आला आहे. रांचीतून या गटाचा प्रमुख अश्रफ दानिश, तर दिल्लीतून आफताब आणि सुफियान यांना अटक करण्यात आली आहे. दानिश हा भारतातील दहशतवादी कारवायांचे नियोजन करत होता. त्याच्या ठिकाणाहून पिस्तूल, काडतुसे, हायड्रोक्लोरिक आणि नायट्रिकसिडसारखी रसायने, तसेच इलेक्ट्रॉनिक सर्किट, लॅपटॉप आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.


पुलिस सूत्रों ने बताया कि ये टेरर मॉड्यूल बड़े आतंकी हमले को अंजाम देने की फिराक में था।


हे सर्व संशयित दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील हँडलर्सच्या संपर्कात होते. भारतात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता. तसेच, सोशल मीडियाचा वापर करून ते भारतातील तरुणांना कट्टरपंथी बनवून आपल्या नेटवर्कमध्ये भरती करत होते. जातीय द्वेष पसरवणे आणि सामाजिक सलोखा बिघडवणे हाही या गटाचा उद्देश होता. या प्रकरणातील प्रमुख आरोपी दानिश हा मागील वर्षी ऑगस्टमध्ये रांचीतून अटक केलेल्या डॉ. इश्तियाकच्या प्रकरणातही फरार होता.


टेरर मॉड्यूल को लेकर दिल्ली, मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद और झारखंड में छापेमारी की गई थी।

हेही वाचा