विदेशी महिला रुग्णाचा विनयभंग केल्याप्रकरणी हेल्थवे हॉस्पिटलमधील डॉक्टरला अटक

व्यवस्थापनाकडून निलंबनाची कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
विदेशी महिला रुग्णाचा विनयभंग केल्याप्रकरणी हेल्थवे हॉस्पिटलमधील डॉक्टरला अटक

पणजी : एका विदेशी महिला रुग्णाचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली हेल्थवे हॉस्पिटलमधील डॉ. व्ही. दोशी (डीएनबी विद्यार्थी) याला पोलिसांनी अटक केली आहे. या गंभीर घटनेनंतर इस्पितळ व्यवस्थापनाने तात्काळ कारवाई करत संबंधित डॉक्टरला निलंबित केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच इस्पितळ व्यवस्थापनाने तात्काळ दखल घेतली. पीडित महिलेकडून तक्रार आल्यानंतर आरोपी डॉ. व्ही. दोशी याला त्याच्या कर्तव्यावरून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे.

हेल्थवे हॉस्पिटलने पीडित महिलेला पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या ती महिला इस्पितळात उपचार घेत असून, या कठीण काळात तिला सर्व नैतिक आणि आवश्यक मदत पुरवत राहण्याची ग्वाहीही इस्पितळ प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा