मनसे नेत्याची माहिती
पणजी : टायर कंपनी एमआरएफने कुडाळ येथे आयोजित केलेली नोकरभरती मोहीम रद्द केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी गुरुवारी दिली. गोव्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या भरती प्रक्रियेला राजकीय वळण दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआरएफने ही भरती मोहिम रद्द केल्याबाबत अधिकृत ईमेल पाठवला आहे. कंपनीच्या कुडाळ येथील भरतीवर गोव्यातील अनेकांकडून बारीक लक्ष ठेवले गेले होते, कारण यापूर्वीदेखील एमआरएफच्या फोंडा युनिटमध्ये स्थानिकांना मिळणाऱ्या नोकरीच्या संधींवरून वाद निर्माण झाला होता. धीरज परब यांनी या राजकीय हस्तक्षेपामुळे सिंधुदुर्गातील तरुणांच्या रोजगाराच्या संधींवर थेट परिणाम झाल्याची टीका केली.